• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिवसेना (शिंदे गट) अमळनेर तालुका प्रमुख पदी सुरेश पाटील यांची निवड

May 5, 2025

Loading

शिवसेना (शिंदे गट) अमळनेर तालुका प्रमुख पदी सुरेश पाटील यांची निवड

अमळनेर :
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या अमळनेर तालुकाप्रमुख पदी सुरेश अर्जुन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास पक्ष श्रेष्ठींनी ठेवत सुरेश पाटील यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संसदरत्न खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून नियुक्तीपत्रावर शिवसेना सचिव संजय मोरे यांची सही आहे.

 

 

 

यावेळी पारोळा आमदार अमोल पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सह सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, विष्णू भंगाळे, महिला जिल्हा प्रमुख सारिका माळी, अमळनेर शहर प्रमुख संजय कौतिक पाटील तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शाल, श्रीफळ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार चिमणराव पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी जि. प. सदस्य तथा जळगाव युवा नेते प्रताप गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक विक्रांत पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, अमित ललवाणी, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहित कोकटा, संजय कौतिक पाटील, उप शहर प्रमुख युवा सेना प्रवीण पाटील, जालना जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, रिटा बाविस्कर, डॉ. प्रशांत शिंदे, ढेकू सिम सरपंच सुरेखा प्रवीण पाटील, हेडावे माजी सरपंच रवींद्र पाटील, रितेश बोरसे, ग्राहक कल्याण मंचचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed