• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

**वाकटुकीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहाचा महापर्व; शाळेला भेटीमुळे नवीन उजाडले भविष्य!**

May 6, 2025

Loading

जि प शाळा वाकटुकीस मिळाले ग्रंथालय भेट

 

धरणगाव प्रतिनिधी

दि 1/5/2025 रोजी जि प शाळा वाकटुकी ता धरणगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त श्रीमती निर्मलाताई श्रीकृष्णराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी कै वा श्रीकृष्णराव माधवराव पाटील यांच्या 21 व्या पुण्यस्मरणानिमीत्त निर्मलाताई श्रीकृष्णराव पाटील यांच्या कडून शाळेला ग्रंथालयासाठी 734 पुस्तके व कपाट भेट देण्यात आले प्रत्येक वर्षी इ चौथीमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यार्या विद्यार्थ्याला यांच्याकडून 1000/ रुपयांचे बक्षीस दिले जाते शाळेच्या वतीने शाॅल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे कै वा शामराव भादु पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ देवयानीताई पाटील (PSI) यांच्याकडून एम टी एस या परिक्षेत जास्त गुण मिळविणारी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर सावंतला 1100 रुपयांचे बक्षीस देण्यात आले यापुढेही स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळविणार्या विद्यार्थ्याला हे बक्षीस दिले जाईल असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला सरपंच श्री सुरेश पोपट पाटील पोलिस पाटील श्री भिकन पोपट पाटील शा व्य समितीचे अध्यक्ष श्री संदीप शंकर पाटील उपाध्यक्ष सौ कविता किशोर सावंत श्री पंकज पवार श्री पितांबर पाटील श्री सोपान पाटील श्री समाधान सावंत भावना पाटील उपस्थित होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेत जि प शाळा वाकटुकीचा तालुक्यात प्रथम क्रमांक आणि परस बागेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला म्हणून व शाळेतील प्रसन्न वातावरण पाहून निर्मला ताईंनी शिक्षकांचे व ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रामेश्वरी अरुण बडगुजर यांनी केले तर आभार श्री संभाजी शिवाजी बिराजदार यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed