• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा

May 9, 2025

Loading

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर: 15 मे रोजी अमळनेर येथे जनतेसाठी खुले शिबीर

गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेसाठी समाधान शिबीर अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यात तक्रारी निवारण शिबीर-तहसीलदार सुराणा

अमळनेर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ”
अमळनेर मंडळ भागातील अमळनेर, मंगरुळ, अंतुर्ली, धार, रंजाणे व मालपूर या गावातील तमाम नागरिकांना याद्वारे आव्हानित करण्यात येते की, गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विदयार्थी व महिला यांचे सर्व विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यासंबंधी म. उपसचिव महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 चा शासननिर्णय प्राप्त झालेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत दिनांक 15/05/2025 (वार गुरुवार) रोजी इंदिरा भवन मंगल कार्यालय, स्टेट बँकेच्या मागे, अमळनेर ता. अमळनेर येथे सकाळी 10.00 ते सायं. 04.00 या वेळेत तालुका स्तरावरील कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी स्वतः उपस्थित राहून आपल्या विभागाशी संबंधित जनतेच्या दैनंदिन समस्या/तक्रारी सत्वर निकाली काढणार आहेत. तरी आपण सर्वांनी वर नमूद स्थळी व वेळी उपस्थित राहून आपल्या तक्रारींचे/समस्यांचे निराकरण करुन घ्यावे. सदर दिवशी येतांना नागरिकांनी आपल्या तक्रारीशी संबंधित कागदपत्रे सोबत घेवून यावीत, जेणे करुन तक्रारीचे निराकरण ताताडीने करणे शक्य होईल.
तरी उक्त नमूद दिवशी व ठिकाणी आपण आपल्या समस्या/तक्रारीच्या निवारणार्थ स्वतः उपस्थित राहून सदर शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *