• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

स्पर्धा परीक्षा: व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली, आत्मविश्वासाचा पाया”- सह आयुक्त कपिल पवार दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

May 12, 2025

Loading

“स्पर्धा परीक्षा: व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली, आत्मविश्वासाचा पाया”-
सह आयुक्त कपिल पवार

दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

अमळनेर प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवतात आत्मविश्वास वाढतो व प्रवास सुकर होतो असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचालित साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित दोन दिवशीय स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस आर चौधरी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त डी वाय एस पी सुनील नंदवाडकर, अमळनेर उपविभागाचे डी वाय एस पी विनायक कोते, अन्न व प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्त पदी निवड झालेले जयकुमार पाटील, मुख्याध्यापक व्ही.झेड पाटील, तसेच श्रमसाफल्य अभ्यासिकाचे संचालक के एल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

 

 

 

निवृत्ती डी वाय एस पी सुनील नंदवाडकर म्हणाले की शिक्षणासोबत चारित्र्यसंपन्न पिढी घडली पाहिजे विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा आत्मविश्वास संपादन करून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले पाहिजे. तुम्ही कोणत्याही पदावर जा परंतु समाजसेवेचे व्रत घ्या. अमळनेर उपविभागाचे डीवायएसपी विनायक कोते यांनी एमपीएससी पूर्व मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी याबद्दल सखोल माहिती दिली व वेळोवेळी मी या ठिकाणी मार्गदर्शन करेल असा त्यांनी विश्वास दिला. नुकतेच एमपीएससी उत्तीर्ण अन्न औषध प्रशासनात सहाय्यक आयुक्त पदी निवड झालेले जयकुमार पाटील यांनी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वाचावीत स्पर्धा परीक्षांच्या विविध टप्प्यांवर आपण स्वतःला कसे सिद्ध करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत विविध पदांवर निवड झालेल्या यशवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यात महसूल सहायक पदी निवड झालेले उदय सोनार, आरोग्य सेवक पदी निवड झालेले प्रशांत पाटील, मृद व जलसंधारण अधिकारी वर्ग दोन पदी निवड झालेले मयूर साळुंखे, रिसर्च ऑफिसर पदावर निवड झालेले हिमांशू पवार, न्यायालय लिपिक पदी झाल्याबद्दल जितेंद्र अहिरे , पीएचडी पदवी मिळवल्याबद्दल सौ सपना रावते यांचा सत्कार करण्यात आला.
दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे व बक्षीसांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील बक्षिसे एलआयसी ऑफिसर सुनील चौधरी ग्रंथालयाचे संचालक बापू नगावकर जाधव इंग्लिश क्लासेसचे संचालक विनोद जाधव व स्वादिष्ट नमकीनचे संचालक निलेश पाटील यांच्या दातृत्वातून देण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचा समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विविध स्पर्धांमधील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे.
*सामान्यज्ञान स्पर्धा*
नम्रता दिलीप सोनवणे, प्रथम
प्रिया राजूसिंग परदेशी,द्वितीय
गौरव गजानन पाटील, तृतीय
*वक्तृत्व स्पर्धा*
स्नेहल योगेश सिसोदे ,प्रथम
मानसी कैलास चौधरी,द्वितीय
हर्षदा महेंद्र पाटील ,तृतीय
*निबंध स्पर्धा*
मोरे जयश्री बापू प्रथम
प्रतीक्षा संतोष थोरात, द्वितीय
प्रिय राजूसिंग परदेशी ,तृतीय
*रांगोळी स्पर्धा*
वैष्णवी रामकृष्ण शेलकर, प्रथम
नम्रता राजेंद्र भोई, द्वितीय
प्रिया राजुसिंग परदेशी ,तृतीय
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, तलाठी मधुकर पाटील,आरोग्य सेवक प्रशांत पाटील, आरोग्य सेवक रवींद्र जाधव, व वनरक्षक महेश पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.
पोस्टल असिस्टंट संदीप पाटील प्रा. अवित पाटील, प्रा. प्रकाश पाटील, पंकज कॉम्प्युटरचे संचालक राजेंद्र भावसार, साने गुरुजी फाउंडेशनचे संचालक नरेंद्र पाटील, पत्रकार अजय भामरे,, सोपान भवरे , दीपक वाल्हे, शरद पाटील पकंज पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मेघा मोरे ,प्रिया परदेशी, मयूर पाटील, यांनी मनोगते व्यक्त केले तर
स्नेहल सिसोदे मेघा मोरे जयश्री मोरे वैष्णवी शेलकर या विद्यार्थिनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed