• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव १०० टक्के निकाल* *विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

May 13, 2025

Loading

*ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव १०० टक्के निकाल*
*विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

फेब्रु-मार्च २०२५ माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक सृष्टी विशाल कुलकर्णी98% व्दितीय क्रमांक दामोदर धनंजय चौधरी 97.20% तृतीय क्रमांक पुर्वा कांतीलाल चौधरी 97% या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर 90 टक्के च्या वर 25 विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले तर,विशेष गुणवत्ता श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यी134 प्रथम श्रेणीत85, व्दितीय श्रेणीत 22 विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी विद्यालयात ऑनलाइन निकाल बघून आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना पेढे भरवले याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत पालकांना आनंदाश्रू तराळले प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी आणि 90% च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह शाळेत सत्कार करण्यात आला .विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,सर्व पदाधिकारी ,संचालक मंडळ व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed