
*ठिय्या आंदोलन… आणि पगार खात्यावर जमा झाले….*
जळगाव:- जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे नियमित पगार बिल प्रलंबित होते. सुरवातीला शालार्थ आय् डी घोटाळा.. चौकशीच्या नावाखाली काही दिवस वेतन पथक ट्रेझरीला बिल सादर करत नव्हते.संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वेतन पथकाने बिल सादर केले, परंतु मार्च महिन्यात वेतन पथकाने सादर केलेले बिल मिस मॅच अकाऊंट नंबर मुळे प्रलंबित होते. याकडे वेतन पथकाने दुर्लक्ष केले. या प्रलंबित बिला मुळे एप्रिल महिन्याचे बिल सिस्टीम स्विकारत नव्हती.सदर अडचण राज्य पातळीवरुनच सोडविता येणार होती. कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी बरेच प्रयत्न केले.संघटनेने आमदार सत्यजित तांबे यांना संपर्क साधून सदर अडचण दूर करण्यासाठी विनंती केली त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून अडचण सोडवण्यात आली. अडचण दूर होऊनही *कोषागार कार्यालयातील दिरंगाई मुळे व अडवणुकीमुळे* वेतन बिल मंजूर होत नव्हते. म्हणून आज *जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन केले* व *वेतन खात्यावर जमा झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका घेतल्यामुळे* व संबंधित कर्मचाऱ्याच्या आडमुठ्या धोरणाबाबत खेद व्यक्त करण्यात आला. *कोषागार अधिकारी यांनी तातडीने त्याच वेळी सर्व बिले मंजूर केली.वेतन खात्यावर जमा झाल्याचे मेसेज आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले*. सदर आंदोलन एस्.डी.भिरुड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी प्रा.सुनील गरुड, बाळासाहेब पाटील, राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, प्रविण पाटील, अरुण सपकाळे,एस्.के.पाटील, अतुल इंगळे, एन्.ओ.चौधरी, प्रदीप वाणी, गोपाळ पाटील, गोपाळ महाजन, सारंग जोशी, साहेबराव बागुल, चंद्रकांत कोळी, किरण पाटील, दिनेश पाटील, मनोज वाघ, गजानन किरंगे, एन्.बी.पाटील , सचिन माळी , विलास पाटील आदी उपस्थित होते.