• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

“34 वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर प्राचार्य सत्यनारायण शिवलाल वैष्णव यांचा थोरगव्हान डी एस देशमुख विद्यालयातून सेवानिवृत्तीचा समारोप”

May 25, 2025

Loading

“34 वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर प्राचार्य सत्यनारायण शिवलाल वैष्णव यांचा थोरगव्हान डी एस देशमुख विद्यालयातून सेवानिवृत्तीचा समारोप”

जळगांव प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हान (स्थापना 1917) संचालित डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल, थोरगव्हानचे प्राचार्य आदरणीय बापूसाहेब श्री सत्यनारायण शिवलाल वैष्णव, ज्यांना ‘सतीश बैरागी’ या नावानेही अनेक लोक परिचित आहेत, मे महिन्याच्या अखेरीस नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
श्री एस एस वैष्णव सर यांनी गेल्या 34 वर्षांपासून थोरगव्हान येथे सातत्याने कार्य केले आहे. त्यांनी शिक्षक म्हणून 28 वर्ष, पर्यवेक्षक म्हणून 1 वर्ष व मुख्याध्यापक म्हणून 7 वर्षे कार्यभार सांभाळला आहे. वरडी ता. चोपडा येथील रहिवासी असलेल्या वैष्णव सरांचे लहान बंधू कै प्रा आर एस वैष्णव, प्रताप कॉलेज, अमळनेर येथे कार्यरत आहेत.
त्यांच्या सेवाक्षेत्रात त्यांनी तन, मन, धन या तिन्हीचा उपयोग करून थोरगव्हान व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक व नैतिक मार्गदर्शन केले. एक कुशल प्रशासक आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा वेगळा ठसा ऊमटलेला आहे. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांमध्येही भरीव कामगिरी केली असून विविध संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
वैष्णव सरांनी शिक्षकांच्या आग्रहावरून रावेर तालुका माध्यमिक शिक्षक कर्मचारी पतपेढी ह्या पतसंस्थेचे बिनविरोध संचालक व सचिव म्हणूनही कार्य केले आहे. निसर्ग व पर्यावरण मंडल महाराष्ट्रराज्य यांच्या भूतान अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडली. तसेच, त्यांनी CCRT दिल्लीचे प्रशिक्षण घेतले असून 10 वी व 12 वी बोर्ड भरारी पथक व अविरत या संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रशासकीय कामगिरीमुळे शाळा आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे मन त्यांनी जिंकले.
श्री वैष्णव सरांनी विविध विषयांमध्ये तालुका, जिल्हा व विभागीय पातळीवर तज्ञ व मार्गदर्शक म्हणून महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या स्पष्ट वक्तृत्व, प्रामाणिकपणामुळे, निस्वार्थी वृत्तीमुळे, तत्पर व निर्भीड स्वभावामुळे शाळा व विद्यार्थी यांच्या विकासासाठी त्यांना नेहमीच ओळखले गेले.
त्यांना माजी चेअरमन कै गंगाधरराव देशमुख, श्री चंद्रकांत दादा देशमुख (यावल), रावेर तालुक्याचे माजी आमदार व माजी चेअरमन कै आर आर पाटील, विद्यमान चेअरमन श्री चंद्रकांत जनार्दन चौधरी, उपाध्यक्ष श्री उमाकांत बाउस्कर, सचिव श्री पवनभाऊ चौधरी यांसह सर्व संचालक मंडळ आणि पंचक्रोशीतील जाणकार नागरिक, पालक, शिक्षण विभागातील अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, शिक्षक, आमदार, स्थानिक आमदार व खासदार यांचे सतत मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावामुळे त्यांना तालुका व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. शेती क्षेत्रातही वैष्णव सर विविध पिकांबाबत नवीन प्रयोग करत असल्याने ते वरडी गावातील एक प्रयोगशील शेतकरी म्हणूनही परिचित आहेत.
वैष्णव सरांना दोन उच्चशिक्षित मुली, नातू, पत्नी असे संपूर्ण कुटुंब असून सध्या ते वाघोदा खुर्द येथे मुक्काम करीत आहेत. सर्व हितचिंतक व शाळा परिवाराकडून त्यांना आगामी सेवानिवृत्तिपुर्व काळासाठी सुखद, समाधानकारक व समृद्ध जीवनाची शुभेच्छा देण्यात येत आहे.
श्री सत्यनारायण शिवलाल वैष्णव यांच्या अथक परिश्रमांनी थोरगव्हानमधील शैक्षणिक क्षेत्राला नक्कीच मोठा पाया मिळाला आहे. त्यांच्या योगदानाला सतत स्मरण ठेवले जाईल आणि त्यांच्या पदचिन्हांवर पुढील पिढीने चालत राहावे, ही सर्वांची इच्छा आहे.

*सत्यनारायण वैष्णव सरांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा काही मान्यवरांनी दिल्या खालील प्रमाणे.*
सेवानिवृत्तीचा दिवस हा कामाचा
शेवटचा दिवस असला तरी
तुमच्या वर आता दुसऱ्या कामांची जबाबदारी येणार आहे
सेवा निवृत्तीचा आनंद घ्या..!
💐💐💐💐
शुभेच्छुक
विलासराव पाटील
राष्ट्रीय अध्यक्ष
अखिल भारतीय माळी महासंघ
—————————————/—–/-

आता नको घड्याळ आणि नको कामाचा ताण..
सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम छान..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
💐💐💐💐💐
शुभेच्छुक
प्रवीण पाटील
सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक चोपडा

———————-;-;———————-///
आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे
नाव असले जरी सेवानिवृत्ती तरी
तीच घेऊन येईल तुमच्या
आयुष्यात एक नवी क्रांती…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.
💐💐💐💐
शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
उपशिक्षक
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed