
रऊफ बँड पथकावर कार्यवाही करा..
अमळनेर भाजप पदाधिकाऱ्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील रऊफ बँड पथकाचा मालक असलम अली (वय 29) रा. सराफ बाजार अमळनेर याने चोपडा तालुक्यातील धानोरा येथील १५ वर्ष अल्पवयीन मुलीस फसवून तिच्या सोबत गैरवर्तन करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदर प्रकरणात चोपडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक व गंभीर आहे.
सदर गुन्ह्यात रऊफ बँड पथकाच्या गाडीचा वापर झाल्याचेही निदर्शनास आले आहे. ही गाडी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करत जिल्हाभर फिरते. या पार्श्वभूमीवर, पुढे कोणताही सामाजिक उद्रेक अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रऊफ बँड पथकाची गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करावी.
तसेच, अशा नीच कृत्यांमध्ये सहभाग असलेल्या असलम अली व त्याच्या बँड पथकातील सहकार्याचे मोबाईल ताब्यात घेऊन सी डी आर काढून त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकाराला आळा बसेल अशी विनंती भाजप पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे केली..
निवेदन देते वेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते
निवेदनावर जिजाबराव पाटील भाजपा जानवे मंडळ अध्यक्ष अमळनेर, योगेश गोविंदा महाजन शहर अध्यक्ष भाजपा अमळनेर, राहुल किशोर पाटील भाजपा पातोंडा मंडळ अध्यक्ष,माजी नगरसेवक श्याम पाटील, जिजाबराव पाटील तालुका अध्यक्ष ,राहुल पाटील अंतुर्ली तालुका अध्यक्ष, देविदास लांडगे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, समाधान नाना पाटील भाजप युवा मोर्चा शहर सरचिटणीस, रवींद्र ठाकूर वाहतूक आघाडी ,सुमित राजपूत, विक्रांत भास्करराव पाटील माजी नगरसेवक , शिवसेना अमळनेर तालुकाप्रमुख सुरेश पाटील,मा.नगरसेवक संजय पाटील,
गोकुळ पाटील भाजपा सदस्य मनोज मिस्तरी मानव शिंदे सदस्य भाजपा, रक्तदान चळवळीचे युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे अमळनेर सह विविध संघटनेचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. व त्यांच्या सह्या आहेत..