शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण

Loading

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध

माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण

जळगांव प्रतिनिधी
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध असून सेवा हमी कायद्यानुसार दिलेल्या वेळेमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातील अशा पद्धतीचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी ताईसाहेब कल्पना चव्हाण यांनी नाशिक विभाग शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून पंचायत समिती सभागृह एरंडोल या ठिकाणी आयोजित शिक्षक तक्रार निवारण सभेत केले. ज्या तक्रारदारांचे अर्ज आलेले आहेत त्या तक्रारदारांच्या प्रकरणांमध्ये समक्ष लक्ष घालून संबंधितांचे प्रश्न तातडीने सोडवू, असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. काही शिक्षकांच्या प्रश्नी तात्काळ वेतन विभाग अधीक्षक व अन्य संबंधित मुख्याध्यापक आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांचे प्रश्न निकाली काढले.
नाशिक विभाग शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून एरंडोल, धरणगाव, पारोळा व भडगाव तालुक्यातील शिक्षकांची तक्रार निवारण सभा पंचायत समिती एरंडोल या ठिकाणी आज दिनांक 26 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ व समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉक्टर मिलिंद बागुल यांच्या पुढाकाराने सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीस श्री भरत शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. शिक्षकांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत यासाठी शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे हे कटिबद्ध असून त्यांनी शिक्षक संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामधील शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये सांगितले. तसेच ज्या शिक्षकांचे आज अर्ज प्राप्त झाले आहेत अशा शिक्षकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाईल व संबंधित शिक्षकांना न्याय दिला जाईल अशा पद्धतीची भूमिका मांडली. डॉक्टर मिलिंद बागुल यांनी आपल्या भाषणातून संस्थांतर्गत वाद मिटले पाहिजेत जेणेकरून शिक्षकांच्या समस्या मिटतील, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. तसेच महाशय शिक्षणाधिकारी यांनी आज आलेल्या तक्रार अर्जांचा तातडीने निपटारा करावा अशी मागणी केली.
मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जांवर सदर सभेत चर्चा करण्यात आली. सदर सभेस समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण केदार, तालुकाध्यक्ष प्रकाश तामस्वरे, माजी तालुकाध्यक्ष चिंतामण जाधव, साहेबराव वानखेडे तसेच शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांचे तालुका प्रतिनिधी ओंकार वनसे व रावसाहेब मोहन यांची उपस्थिती होती. सुधाकर मोरे यांनी सदर सभेचे सूत्रसंचालन केले तर आभार भरत शिरसाठ यांनी मानले.

  • Related Posts

    १० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!* *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प*

    Loading

    *१० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!* *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प* *‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार…

    ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह*

    Loading

    *ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह* मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : माधवबाग येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा जयंती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    १० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!* *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प*

    १० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच!*  *उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प*

    ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह*

    ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंच झाली- केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह*

    रमाईच्या त्यागामुळेच बहुजनांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे*. डॉ.मिलिंद बागुल

    रमाईच्या त्यागामुळेच बहुजनांच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे*. डॉ.मिलिंद बागुल

    खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गटाच्या १२ जलरागिनींनी शेतात जलतारा उपचारांसाठी पुढाकार

    खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गटाच्या १२ जलरागिनींनी शेतात जलतारा उपचारांसाठी पुढाकार

    ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील*

    ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील*

    कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील*

    कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमाचा समस्त कोथरूडवासियांनी लाभ घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील*