• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

Jun 2, 2025

Loading

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न
*********************
कल्याण:( प्रतिनिधी सुनील इंगळे)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षा चे ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक प्रथमेश पुण्यर्थी यांनी आयोजित केले होते, यामध्ये शंभर ते दीडशे विविध गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला होता सदर शिबिरात डॉ. सिद्धार्थ मोरे प्रादेशिक संचालक श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट वर अत्यंत सुंदर प्रकारे विषय सादर केला.
कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांनी गृहनिर्माण संस्थेतील, त्यातील सभासदांना येणाऱ्या विविध प्रश्न, अडचणी सादर करून विविध प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली, सरते शेवटी त्यांनी ग्राहक संरक्षण कक्षासाठी एक पंधरा-वीस वकिलांचे पॅनल बनवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी सदर वकील व मी निस्वार्थ सेवा देण्याचे आश्वासन देऊन त्यासंदर्भात कसे आणि कशाप्रकारे नियोजन करावे याचे सर्व अधिकार प्रथमेश पुण्यर्थी यांना दिले.
त्यानंतर दुसरे प्रमुख अतिथी सुधाकर पाटील जे प्रमाणित लेखा प्रशिक्षक, गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका, शेअर सर्टिफिकेट्स कसे ट्रान्सफर करावे त्याबाबतीत काही नियम आहेत, सोबतच सभासदांच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आदी बाबत सखोल माहिती दिली.
या शिबिरात असोसिएशनचे संस्थापक व गृहनिर्माण संस्था पुनर्विकास प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट पीएमसी चे सल्लागार श्री. राजन शुल्क यांनीही डेव्हलपमेंट, कस्टर्ड प्रोजेक्ट याविषयी सखोल माहिती दिली सध्या रीडेव्हलपमेंटचा धुमाकूळ सर्वदूर पोहोचला आहे तो आपण बिल्डरला देणे अथवा स्वतःही डेव्हलपमेंट करणे या दोन्ही बाबतीतील एडवांटेजेस व डिसऍडवांटेज म्हणजे त्या संदर्भातील फायदे आणि तोटे समजावून सांगितले, व उपस्थित ग्राहकांना म्हणजे फ्लॅट धारकांना जे प्रश्न उद्भवत होते त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
सदर कार्यक्रमास कक्ष विभाग संघटक जयवंत टापरे, उदयभान सिंग व सौ. दक्षता तांबे यांनी प्रथमेश पुण्यार्थी त्यांच्यासोबत सदर शिबिर संपन्न होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुनील इंगळे यांनी असे मत व्यक्त केले की काही सोसायटी असतात त्यामध्ये काही सभासद तात्पुरत्या स्वरूपात पद घेतात आणि स्वतःच्या घरामध्ये अनधिकृत तोडणी आणि जोडणी चे कार्य करीत असतात, आपल्यावरील थकबाकी सुद्धा माफ करून घेतात आणि ते केल्यावरती पद सोडून नामा निराळे राहतात आणि त्यावेळी चे सोसायटीचे पदाधिकारी त्यांच्याविषयी रजिस्टर निबंधकाकडे किंवा कोर्ट केसेस कडे कंप्लेंट करण्याविषयी अनुकूल नसतात कारण त्या झंझट मध्ये कोण पडेल हा सगळा प्रॉब्लेम असतो त्याविषयी या चर्चासत्रामध्ये चर्चा झाली.
आभार प्रदर्शनामध्ये श्री प्रथमेश पुण्यार्थी,कक्ष जिल्हा संघटक ठाणे ग्रामीण यांनी असे आवाहन केले आहे की फ्लॅट धारकांना कोणत्याही प्रकारची सेवा अथवा माहिती हवी असल्यास आपल्या ग्राहक संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा आपणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष नेहमी दक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *