डॉ.मनिलाल शिंपी हे गरजू विद्यार्थी व गोरगरिबासाठी मानवसेवेचे उपासक आहेत,
वाढदिवसानिमित्त
अनाथ आश्रमात व आदिवासी वस्तीत मिष्टान्न भोजन चॉकलेट बिस्कीट व किराणा चे वाटप!
कल्याण (प्रतिनिधी)
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे विभागीय कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप च्या माध्यमातून ” जे का रंजले गांजले ! त्याशी म्हणे जो अपुले!!
तोची साधू ओळखावा!
देव तेथेची जानावा!!
या उक्तीप्रमाणे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.श्री.यशवंत अनंत म्हात्रे,समाजसेवक उद्योजक डॉ. श्री.रामचंद्र शांताराम देसले, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर,समाज कल्याण न्यास महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉ.श्री.सोन्या काशीनाथ पाटील, पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. सोमनाथ बळीराम ठाकरे, उद्योजक मार्गदर्शक डॉ.किशोर अढळकर, राजस्थान शिंपी समाजाचे सचिव नटवर वर्मा,यांच्या सहकार्याने” गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी कल्याण चिकनघर येथील आधारवड अनाथ आश्रम” मधील निराधार बालकांना राजगिरा लाडू, चॉकलेट ,बिस्किट्स व किराणा चे वाटप करण्यात आले.तसेच आदिवासी, कातकरी पाड्यात वीटभट्टीवर कामगारांना मिष्टान्न भोजन आमरस पुरी,बिर्याणी,भाजी, चॉकलेट वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशाेर बळीराम पाटील,
पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. सोमनाथ बाळाराम ठाकरे,कल्याण शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश सावळे, पदाधिकारी अरविंद शिंपी, प्रविण भंडारकर, दत्तात्रय निकुंभ, किशोर बागुल, रविंद्र नेरपगार,लेडीज एक्सप्रेसच्या अध्यक्षा श्रीमती मधुबेन ठक्कर,सौ.संगीता मनिलाल शिंपी,प्रसाद शिंपी, आदी मान्यवर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे विभागीय कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून शाल व
विठ्ठल रखुमाई ची मूर्ती भेट देऊन यथोचित सन्मान केला.
व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.अखिल भारतीय शिंपी समाज विश्वस्थ विजयनाना बिरारी,सुरतचे समाज संघटक चंद्रकांत इसई, नंदुरबारचे समाजाध्यक्ष सोमनाथ शिंपी, नामविश्व चे संपादक,उद्योजक पुरुषोत्तम शिंपी, जळगाव जिल्हा अध्यक्ष बंडू नाना,जळगांवचे संजय जगताप, सुजित जाधव,पुणे येथील गोपाळ मेटकर,रामेश्वर धाडणकर,मिलिंद चव्हाण, मायाताई चव्हाण, धुळे समाज अध्यक्ष रमेश शिरसाट, हिसाले येथील निंबादास शिंपी,शिरपूर येथील योगीराज बोरसे, दोंडाईचा येथील समाज अध्यक्ष पांडुरंग शिंपी,यांच्यासह सर्व मित्रमंडळी आणि आप्तेष्ट यांच्या कडून वाढदिवसानिमित शुभेच्छा देण्यात आल्या.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी मित्रपरिवार, समाज माऊली, हितचिंतक, या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.