• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवकांचे नवीन परिवर्तन अभियान! तुषार संनसे आणि दिपक पाटील यांचा विद्यार्थ्यांसाठी मोठा संकल्प!

Jun 13, 2025

Loading

अमळनेरमध्ये राष्ट्रवादी युवकांचे नवीन परिवर्तन अभियान!

तुषार संनसे आणि दिपक पाटील यांचा विद्यार्थ्यांसाठी मोठा संकल्प!

अमळनेर प्रतिनिधी-जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथील चि. दिपक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष नंदुरबार तुषार संनसे यांच्या मार्गदर्शनाखाली, अमळनेर शहरात नवीन परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार करत आहेत. तुषार दादा संनसे व चि. दिपक पाटील यांचे नेतृत्व अमळनेर तालुक्यातील चर्चांमध्ये नवा उधाण आणेल. लोकांमध्ये होणाऱ्या दिशाभूल दूर करण्यासाठी ते संगणकीय पद्धतीने विचार मांडून सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

तीन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायामशाळेच्या कामाला सुरुवात न झाल्याबाबत चि. दिपक पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरगरीब मुलांची वेळेवर भरतीसाठी तयारी करणे आवश्यक आहे, पण त्यांच्या सुविधांचा अभाव असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डाॅ. तुषार संनसे व चि. दिपक पाटील यांच्या महत्वाकांक्षी विचारधारा आणि कार्यशक्तीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि परिवर्तनाची चव प्राप्त झाली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed