
श्री मंगळग्रह मंदिरात जागतिक योग दिन साजरा
श्री मंगळग्रह मंदिरात जागतिक योग दिन साजरा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात संस्थेचे सहसचिव दिलीप बहीरम यांच्या मार्गदर्शनाने जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.
शारीरिक सुदृढता आणि मानसिक शांतता यासाठी योगधारणा महत्वपूर्ण ठरते. भारतातील प्राचीन अभ्यासांपैकी एक असलेला योगाभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारला गेला आहे. याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आहे. त्या अनुशंगाने श्री मंगळग्रह मंदिराच्या नैसर्गिक वातावरणात योग दिनी योग प्रशिक्षक आशिष चौधरी व दिलीप बहिरम यांच्याकडून सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी आ. टी. पाटील, व्हि. व्हि. कुलकर्णी, बाळा पवार यांच्यासमवेत अनेक सेवेकऱ्यांनी योगाचे धडे घेतले.