
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम
आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे ‘सक्षम तू या अभियानातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक पोक्सा सायबर गुन्हेगारी संदर्भात टोल फ्री नंबर ची माहिती आणि आत्मसंरक्षण संदर्भात पोलीस समुपदेशन बीट मार्शल आत्मसंरक्षण संदर्भात पोलीस समुपदेशन बीट मार्शल व दामिनी पथक या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात यावी ही संकल्पना महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रूपालीताई चाकणकर व जळगाव जिल्हा निरीक्षक आदरणीय अश्विनीताई मोगल व जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष आदरणीय ताईसो कल्पनाताई पाटील यांनी ही मोहीम राबविण्यास सांगितली..
विद्यार्थ्यांना बालविवाह विरोधात शपथ देण्यात आली या कार्यक्रमाला अमळनेर पोलीस स्टेशनचे पीआय आदरणीय दत्तात्रय निकम आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ भारती ताई पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला मा. जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, नवीन माध्यमिक विद्यालय च्या अध्यक्षा आदरणीय तिलोत्तमा ताई पाटील अध्यक्ष म्हणून लाभल्या.
या कार्यक्रमाचे उपस्थित रंजनाताई देशमुख रिताताई बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष भारतीताई शिंदे, तालुकाध्यक्ष मंदाकिनी नवल भामरे ,शहराध्यक्ष आशाताई चावरे ,शहर उपाध्यक्ष अलकाताई पवार ,अमळनेर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील ,एलटी पाटील शिवाजीदास भाऊ, शहराध्यक्ष मुक्तार दादा खाटीक ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर ,शाळेचे मुख्याध्यापक आर बी पाटील व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे मोठे सहकार्य लाभले