
सक्षम तू अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये कायदे व आत्मसंरक्षणाची जाणीव” नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या पार
“सक्षम तू अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये कायदे व आत्मसंरक्षणाची जाणीव”
नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या पार
अमळनेर प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने “सक्षम तू अभियान” अंतर्गत नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली येथे विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात पोक्सो कायदा, सायबर गुन्हेगारी, टोल फ्री हेल्पलाईन नंबरची माहिती तसेच आत्मसंरक्षणाचे महत्त्व विषद करण्यात आले.
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल व दामिनी पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रभावी समुपदेशन देण्यात आले. तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाला आधार संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय डॉ भारतीताई पाटील, माझी जि.प. सदस्य जयश्री पाटील, विद्यालयाच्या अध्यक्षा तिल्लोत्तमा पाटील, रंजनाताई देशमुख, रिताताई बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष भारतीताई शिंदे, तालुका अध्यक्ष प्रा. मंदाकिनी भामरे, शहराध्यक्षा आशाताई चावरीया, शहर उपाध्यक्षा अलकाताई पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, नानासाहेब एल. टी. पाटील, शहराध्यक्ष मुक्तारदादा खाटीक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधानभाऊ धनगर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य लाभले.
या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्व सहभागी मान्यवरांचे व आयोजकांचे मन:पूर्वक आभार!