आध्यात्म व समाजसेवेचा संगम  “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश”
1 min read

आध्यात्म व समाजसेवेचा संगम “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश”

Loading

आध्यात्म व समाजसेवेचा संगम

“मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश”

अमळनेर प्रतिनिधी
धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २० रोजी मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. अमळनेरसह चोपडा, धरणगाव यांसह परिसरातील विविध खेड्यापाड्यातील १२६ पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदविला. पैकी ४२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्याने त्यांना तत्काळ पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच केवळ अध्यात्मिकच नव्हे तर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन होऊन शिबिराचा प्रारंभ झाला. आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चंदन चौधरी, डॉ. राहुल चौधरी यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली. शिबिर संयोजक भूपेंद्र वाघ, प्रशांत कोळी, किरण भाई, रोहन कोळी आणि अक्षय पारधी यांनी सहकार्य केले. शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ४२ रुग्णांना आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे तत्काळ वाहनाद्वारे रवाना करण्यात आले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह मंदिरातील सेवेकरी उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले.
यशस्वितेसाठी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मोरे, निखिल सूर्यवंशी, हरिष चव्हाण, तेजस अहिरे, नितेश बारी, प्रमोद पाटील आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *