
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!”
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!”
प्रतिनिधी पिंपळे
ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे महिला व बाल विकास विभागाच्या बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून व कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एच भोसले सर व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील यांच्या प्रेरणेने द्वारा बालविवाह मुक्त, व्यसनमुक्ती ची शपथ घेण्यात आली. तसेच तंबाखू मुक्त गावात ची शपथ घेण्यात आली. गावात प्रभात फेरी
विद्यार्थ्यांनी ‘ मुलींचे शिक्षण- प्रगतीचे रक्षण , पर्यावरण वाचवा- भविष्य घडवा, दारू पळवा -गाव वाचवा अशा आशयघन घोषणा देत गावकऱ्यांचे लक्ष वेधले.
तसेच समृद्धी ग्रामपंचायत व बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून सरपंच उपसरपंच व सदस्यांनी या विद्यार्थ्यांनी पथनाट्य च्या माध्यमातून
मुलींवरील अन्याय, शिक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि दारुमुळे होणारे दुष्परिणाम यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी विद्यालयाचे व पिंपळे खुर्द येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील पुरुषोत्तम लोटन चौधरी निंबा बापू चौधरी गोकुळ पाटील,संतोष चौधरी ग्रामसेवक के के लंकेश मुख्याध्यापक संजय भोसले तसेच या वेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी.बी पाटील ,सी एन पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद ,
गावातील माता भगिनी मोठ्या संख्येने
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते यांनी युवराज पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना जलेबी वाटप करून त्यांचे कौतुक