“श्रद्धा, निसर्ग आणि चमत्कार एकत्र! मंगळग्रह मंदिरात अद्वितीय दृश्य”
1 min read

“श्रद्धा, निसर्ग आणि चमत्कार एकत्र! मंगळग्रह मंदिरात अद्वितीय दृश्य”

Loading

श्रद्धा, निसर्ग आणि चमत्कार एकत्र! मंगळग्रह मंदिरात अद्वितीय दृश्य”

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
आंब्याच्या झाडावर कैऱ्या लागणं हे नेहमीचं असलं तरी, एका एकमेव देठावर चार मोठ्या कैऱ्या लगडलेल्या असतील, हे केवळ पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य ठरत आहे. आणि ही निसर्गाची अद्भुत किमया अनुभवता येते ती श्री मंगळग्रह मंदिर परिसरात!
मंदिरातील एका आंब्याच्या झाडावर, फांदीच्या एका देठावर चार कैऱ्या एकत्रितरित्या उगवलेल्या दिसून येतात. हे दृश्य पाहताच भाविकांना “देवाची करणी आणि नारळात पाणी” ही जुनी म्हण अक्षरश: आठवते.
सामान्यतः आंब्याचा मोहोर फेब्रुवारी-मार्चमध्ये खुलतो आणि कैऱ्या एप्रिल-मे मध्ये मिळतात. मात्र, जुलै महिन्यात कैऱ्या पाहणे म्हणजे दुर्मीळ गोष्ट! श्री मंगळग्रह मंदिर परिसरात मात्र अजूनही भरपूर कैऱ्या झाडांवर लगडलेल्या आहेत, हे पाहून मंदिरात येणारे भाविक आश्चर्यचकित होतात.
या मंदिर परिसराची आणखी एक खासियत म्हणजे, येथे असलेली अनेक फळझाडे — जशी की आंबा, पेरू, चिकू, जांभूळ इत्यादी — यावरील फळे कोणत्याही मानवी उपभोगासाठी नसतात, तर या परिसरात वसलेल्या विविध पक्ष्यांकरिता ती राखून ठेवली जातात. कोणालाही ही फळं तोडण्याची परवानगी नसते.
हे दृश्य केवळ निसर्गाच्या अद्भुत सृष्टीचे नव्हे तर श्रद्धेची, भक्तीची आणि पर्यावरण जतनाच्या संस्कृतीचीही साक्ष देणारे ठरत आहे.
चार कैऱ्यांचा चमत्कार पहायला तुम्हीही श्री मंगळग्रह मंदिरात अवश्य भेट द्या!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *