
दत्त महिला समूहाच्या संयुक्त विद्यमानाने अमळनेर मध्ये योगा दिवस साजरा
दत्त महिला समूहाच्या संयुक्त विद्यमानाने अमळनेर मध्ये योगा दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- छत्रपती शिवाजीनगर श्री दत्त महिला समूहाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योगा दिवसाचा प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. योग शिक्षिका ज्योतीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष सहकार्य ज्योतीताई प्रकाश महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. श्री दत्त समूहाच्या अध्यक्षा, मा. नगरसेवक आबासो प्रताप शिंपी यांच्या अर्धांगिनी ताईसो मनिषा प्रताप शिंपी आणि परिसरातील सर्व माता भगिनींनी उत्साहाने या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने शोभा वाढवली.
कार्यक्रमात माताभाईनींनी एकत्र येऊन योग साधना करून निरोगी आणि तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी संकल्पबद्धतेचा परिचय दिला. योगाच्या महत्वावर चर्चा झाली आणि शरीर-मन यांचे संतुलन राखण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा व प्रताप आबा मित्रपरिवार यांनी उत्कृष्ट सहकार्य व परीश्रम केले, ज्यामुळे या योग शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थित सर्वांचा उत्साह आणि सहभाग पाहून या उपक्रमाला अधिक चांगली प्रेरेणा मिळाली.
योगा दिन साजरा करतांना माताभाईनीं आध्यात्मिक उन्नतीसह आरोग्यदायी जीवनशैलीचा पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट ठेऊन आपापल्या परीने योगाचा सराव सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे स्थानिक समाजात योगाबद्दल अधिक जागरूकता निर्माण होऊन निरोगी आयुष्याचा संदेश प्रसिद्ध होणार आहे असेच स्वागत करण्यात आले.