
हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !… जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !….
हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !…
जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !….
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावातील विद्यमान सरपंच अरुण विश्वास शिरसाठ उपसरपंच प्रविण चुनीलाल बोरसे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. जे ग्रामस्थ आपल्या पाल्यांना ( मुले किंवा मुली ) गावातील जि.प.प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील त्यांना त्यांचे नावावरील आर्थिक वर्ष २०२५ / २६ मधील घरपट्टी व पाणीपट्टीचा कर पुर्ण माफ करण्यात येईल. असे पत्रकच काढुन व गावात दवंडी फिरवली.
आज इंग्रजी माध्यमांच्या शाळा डोकंवर काढू लागल्या आहेत. आपलीच मुले आपल्या मातृभाषा मराठीपासून दुरावत चाललेले आहेत यामुळे जिल्हा परिषद शाळेची संख्या कमी होत आहे म्हणून गावातील उच्चशिक्षित सरपंच अरुण शिरसाठ, उपसरपंच प्रविण बोरसे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकमताने हा निर्णय घेतला की, आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे व आपल्या गावातील विद्यार्थ्यांना मोफत व उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे. या अगोदर ग्रामपंचायत मार्फत असे अनेक चांगले उपक्रम हाती घेतले. घरोघरी शौच्छालय उभे केले, गावाच्या रस्त्यावरील दुतर्फा वृक्षारोपन केले, गावात घरोघरी कचरा जमा करण्यासाठी डस्टबिन देणे, गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे. गावात मोठी पाण्याची टाकी उभी करणे, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध एक्वा फिल्टर प्लॅन सुरू केला. हिंगोणे खुर्द व हिंगोणे बुद्रुक गावासाठी पाच कोटीचा पूल मंजूर करणे. असे विविध कामे ग्रामपंचायत हिंगोणे खुर्द यांनी केले आहेत.
हिंगोणे खुर्द गावात या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत झाले असून इतर गावांसाठी देखील हा प्रेरणादायी उपक्रम आहे.