
कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन -अनिल सुरडकर
कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन आहे
अनिल सुरडकरशासकीय निमशासकीय क्षेत्रात काम करणारा कर्मचारी हा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत असताना अनेक विविध समस्या, लोकसंपर्काच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींचा असणारा कामासाठीचा दबाव, दडपण याचा विचार करता कर्मचारी संघटना ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे साधन असून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहील असे मत कास्ट्राईब कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी संघटनेच्या आयोजित बैठकीत बोलताना व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष सुनिल सोनवणे होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कास्ट्राईब कर्मचारी संघटनचे जिल्हाध्यक्ष आर. टी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. कास्ट्राईब शासकीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी शासकीय, निमशासकीय तसेच प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने कायद्याच्या चौकटीत राहून नियम, नियमावलीला अवगत करून आपल्या कडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान होईल अशा दृष्टीने कर्तव्य परिपूर्ती केल्यास कार्यालयाचा चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण होत असते येणाऱ्या अडचणी आपल्याला सोडविता येतात आपल्या सेवेत निश्चितपणे संघटनेचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा असतो ते संघटन मजबूत करण्यासाठी आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी मांडले. प्रमुख अतिथी रावसाहेब जगताप यांनी संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून नाशिक विभागातील जिल्ह्यात मेळावे आयोजन करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहून संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. संघटन करण्याच्या दृष्टीने मोहन पालवे, डॉ. प्रदीप सुरवाडकर, सुनील जाधव,गौतम वाडे,दिलीप शिरतुरे,सलीम तडवी, यांनी मनोगत व्यक्त केलीत. नाशिक विभागीय अध्यक्षपदी रावसाहेब जगताप यांची निवड झाल्याने त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. बैठकीस रवींद्र पालवे अनिल पगारे,,बैसाणे आप्पा, सलिम तडवी, नारायण तुपकर,डी. ओ. सोनवणे, प्रदीप इंगळे, नरेंद्र निकुंभ, प्रशांत सोनवणे,गोपाल सोनवणे,नाना पाटील,मुकुंद इंगळे,बुद्धभूषण सपकाळे व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार जितेंद्र जावळे यांनी मानले.