
मंगरूळ विदयालयात दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या आठवणींचा उजाळा;
मंगरूळ विदयालयात दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या आठवणींचा उजाळा;
अमळनेर प्रतिनिधी
मंगरूळ येथे माध्यमिक विदयालयात 2006-07 इयत्ता दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत, समृद्ध सहकार्याचा नवा अध्याय लिहिण्यात आला. अध्यक्ष श्री अशोक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिक्षिका श्रीमती श्रुती श्रीकांत पाटील आणि उपसरपंच मंगरुळ यांच्या उपस्थितीने शोभा वाढली.
या कार्यक्रमात, श्री राजेंद्र श्रीराम पाटील, भटू पाटील, सीमा पाटील, प्रविण पाटील, मनोज पाटील, राहुल पाटील, खुशाल पाटील, प्रदीप पाटील तसेच श्री दादासो श्रीकांत पाटील आणि संस्थेचे सचिव यांनी शाळा उपलब्ध करून देताना अनमोल सहकार्य दिले, जे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. यामुळे परिसरातील शैक्षणिक क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे.
सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी केले आणि गेट-टुगेदरच्या यशस्वी आयोजनासाठी श्री जगदीश मराठे, श्री पद्माकर बागुल, श्री भूषण पाटील, श्री मनोहर पाटील, सौ पल्लवी पाटील तसेच 2006-07च्या संपूर्ण इयत्ता दहावीच्या बॅचने एकत्र येऊन जबरदस्त सहकार्य केले.
कार्यक्रमादरम्यान जुन्या शालेय आठवणींचा मागोवा घेऊन, शिक्षकांशी संवाद साधत, विद्यार्थी काळजाला भिडणारे किस्से शेअर करताना दिसले. या गेट-टुगेदरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती दिली तसेच भविष्यातील योजना आणि ध्येयांवरही चर्चा केली.
शालेय सहवास आणि सामाजिक बांधिलकी यांना या कार्यक्रमाने अधिक घट्ट बनवले असून, शिक्षण आणि सामाजिक समन्वयाला चालना देणारा हा उपक्रम भविष्यातही चालू राहणार असल्याचे भावी पिढीने आशा व्यक्त केली.