निष्ठेचं चीज! गजेंद्र साळुंखेंवर काँग्रेसची शहराध्यक्षपदाची धुरा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते गजेंद्र दत्तात्रेय साळुंखे,ता. अमळनेर, जि. जळगाव यांची मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून नियुक्ती जळगांव ग्रामीण जिल्ह्यातील अमळनेर शहर ब्लॉक अध्यक्षपदी करण्यात आली आहे.आपण
आपल्या भागातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करावे ही अपेक्षा. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री गजेंद्र दत्तात्रय साळुंखे हे 1985 पासून कॉग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ते आहेत. 1993 कॉग्रेस पक्षाचा शाखा अध्यक्ष 2001 अध्यक्ष युवक काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळगाव जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती 1985 पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत आहे .आज पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची प्रमाणिक सेवा करीत आहे. त्यांच्या निवडीबद्दल अमळनेर तालुका काँग्रेसचे जिल्हा, तालुका सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.