“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा ‘हल्ला बोल’; माजी आमदार डॉ. पाटील,प्रा सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन!”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यात सध्या रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या वतीने “हल्ला बोल” आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व मा. आमदार डॉ. बी.एस. पाटील आणि प्रा. सुभाष जिभाऊ यांनी केले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका अध्यक्ष डी.एम. पाटील सर, शिवसेनेकडून विजू मास्तर, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा, प्रा. अशोक पवार सर, मनोहर नाना निकम आणि भागवत गुरुजी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडत सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर अण्णा, प्रताप आबा, मुन्ना शर्मा, डॉ. रविंद्र पाटील, बोरसे आबा, कैलास आप्पा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत निकम, जाकीर शेख, मनोहर पाटील, वासुदेव मामा, महिला अध्यक्षा योजना पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रशेखर भावसार तसेच महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर उपविभागीय कृषी अधिकारी साठे साहेब, तालुका कृषी अधिकारी ठाकरे साहेब व प. स. कृषी विस्तार अधिकारी ठाकूर साहेब यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदिप घोरपडे सर यांनी केले.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महाविकास आघाडीने दाखवलेला सजगपणा आणि एकत्रित भूमिका या आंदोलनातून ठळकपणे समोर आली.