“स्मृतीमध्ये संवेदना – विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची वही”
भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये 125 वह्यांचे वाटप – एक प्रेरणादायी उपक्रम
भुसावळ-नगरपरिषद संचलित
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बी. वाय. सोनवणे यांनी त्यांचा मुलगा कै. गौरव भानुदास सोनवणे. याच्या स्मृती प्रित्यर्थ 125 वह्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केल्या.सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस .जी. मेढे , सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी बी.वाय. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे व नियमित शाळेत येऊन आपणास दिलेल्या वह्यांमध्ये लिखाण कार्य रोजच्या रोज पूर्ण करावे.अजून काही विद्यार्थ्यांना वह्या लागल्यास त्या सुद्धा देण्याचं त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.