गौरवाचा, कृतज्ञतेचा आणि स्मृतींचा अत्यंत हा भावनिक क्षण.!
अमळनेर प्रतिनिधी
माझ्या अमळनेर मतदारसंघातील डांगर (ता. अमळनेर) गावाचे नाव बदलून आता “उदय नगर” असे ठेवण्यात आले आहे.या निर्णयामागे आहे स्वर्गीय उदयबापू वाघ यांच्या असामान्य कार्याचा आणि योगदानाचा सन्मान!.माझ्या स्वर्गीय मित्राचे गावाशी नाळ असलेले जीवन, समाजासाठी समर्पित कार्य, आणि कायम स्मरणात राहणारी कर्तृत्वगाथा .. यास महाराष्ट्र शासनाने मान्यता देत त्यांच्या नावाने गावाचे नामकरण करून शाश्वत श्रद्धांजली अर्पण केली आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..! आजपासून “उदय नगर” हे नाव केवळ गावाचे नाही, तर एका प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाचे स्मारक ठरणार आहे.
असे अनिल भाईदास पाटील(आमदार अमळनेर, मतदारसंघ)
मा.मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.