उमेश महाजन यांची लोक क्रांती युवा सेनेच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड*
जळगांव प्रतिनिधी
आज लोक क्रांती सेनेच्या मध्यवर्ती कार्यालय, नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.*
*या बैठकीत लोक क्रांती युवा सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नागेश काठोळे, लोक क्रांती सेनेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रंगनाथ कुचेकर तसेच लोक क्रांती युवा सेनेच्या विभागीय अध्यक्षपदी महाराष्ट्र भूषण महाजन यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.*
*तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सखोल चर्चा करण्यात आली व संघटनेच्या पुढील रणनीतीवर विचार विनिमय झाला.*
*या प्रसंगी लोक क्रांती शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत सुरसे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर देवरे, महिला सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष दिपश्री देवरे, वाहतूक सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नीरज भालेराव, नाशिक कार्याध्यक्ष विजय सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी व क्रांती सैनिक उपस्थित होते.*