अंतुर्लीचा विजय! लोको पायलट बनून पंचकोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
सामान्य कुटुंबात वाढलेल्या विजय नाना पाटील यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर भारतीय रेल्वे (पश्चिम विभाग) मध्ये लोको पायलट म्हणून यशस्वी निवड मिळवली आहे. आज ते ट्रेनिंगसाठी उदयपूर येथे रवाना झाले. त्यांची ही कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण अंतुर्ली व पंचकोशी परिसरासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
विजय पाटील यांचे वडील लहानपणीच निधन पावले. त्यांच्या आईने जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराच्या कामावर खंबीरपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलाचे शिक्षण थांबू दिले नाही. घरातील कठीण परिस्थितीवर मात करत विजय यांनी यशाची उंच झेप घेतली.
त्यांच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन पाटील यांनी विजय यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. विजय यांचे यश हे तरुण पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे.