भक्तिरसात न्हालं संत गजानन महाराज मंदिर आषाढी एकादशीला उत्साहाची लहर!
अमळनेर प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने अमळनेर येथील दादासाहेब जी.एम. सोनार नगरातील संत गजानन महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सत्संग महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या भक्तिरसात न्हालेल्या कार्यक्रमात परिसरातील सर्व गजानन महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भजन, कीर्तन, अभंग आणि हरिपाठ यामुळे मंदिर परिसर चैतन्याने भरून गेला होता.
कार्यक्रमाची सांगता हरिपाठ आणि सामूहिक आरतीने करण्यात आली. एकंदरीत, आषाढी एकादशीचा हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.