आषाढी एकादशी निमित्त रंगला पालखी सोहळा !..
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव- येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व आदर्श माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी,व वृक्षदिंडी सोहळ्याने शहरवासीयांची लक्ष वेधून घेतले
पारंपरिक वेषभूषा करून विद्यार्थ्यांनी विठूनामाच्या जयघोषात शहर दणाणून सोडले पालखीची सुरुवात इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातून झाली इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव तथा आदर्श विद्यालयाचे अध्यक्ष सी.के.पाटील आणि इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या तथा आदर्श विद्यालयाच्या सचिव सुरेखा पाटील यांच्या हस्ते पूजा करून ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी ला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुगाच्या गजरात गोड आवाजात अभंग,गवळणी गायल्या चौकाचौकात विद्यार्थिनींनी झिम्मा-फुगड्या खेळल्या गोल रिंगण करून अभंगाच्या चालीवर विद्यार्थ्यांनी मनमोकळे पणाने पाचपावली घेत नृत्य सादर केले
इंदिरा गांधी विद्यालयातून निघालेल्या पालखीचे दर्शन शहरातील अनेक महिलांनी घेतला व भक्तिभावाने पालखीची पूजा केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,परिहार चौक, महात्मा फुले चौक, धनगर गल्ली,बसस्टँड,पोलीस स्टेशन या मार्गाने ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने फिरत परत विद्यालयात समाप्त झाली.आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एस.पाटील यांनी पालखीची आरती करून समारोप केला. शेवटी विद्यार्थ्यांना पोषण आहार देऊन घरी सोडण्यात आले
या पालखी सोहळ्याचे संचालन क्रिडाशिक्षक डी.एन.पाटील, जेष्ठ कलाशिक्षक आर.एन.पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली पाटील यांनी केले तर आभार जेष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी दोन्ही विद्यालयातील शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधूनी मेहनत घेतली