*व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे पटांगण विठूनामाने बहरले..!!!*
अमळनेर प्रतिनिधी
” टाळ वाजे, मृदुंग वाजे
वाजे हरीची विणा!
माऊली निघाली पंढरपुरी
मुखाने विठ्ठल बोला!! ”
आषाढी एकादशी हा भगवान श्री विठ्ठलाचा सण आहे मुलांना आपल्या परंपरेची तसेच सामाजिक समतेचे महत्व सांगणाऱ्या आणि नैतिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आज शहरातील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.
उपस्थित मान्यवर संस्थेचे चेअरमन श्री. उत्कर्ष पवार तसेच संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार, श्री. उमाकांत पाटील यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, पालखी पूजन व विठ्ठलाची आरती झाली. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीची माहिती सांगितली.
विठ्ठल- रखुमाई, वारकरी अशा वेगवेगळ्या आकर्षक पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसरातून काढलेली ‘दिंडी’ आणि ‘माऊली माऊलीचा जयघोष’ यामुळे चैतन्य अवतरले होते. शाळेच्या प्राचार्या तसेच सर्व शिक्षिका यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. चिमुकल्या बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तिमय केला होता.
दरम्यान शहरातील वाडी येथे ‘संत सखाराम महाराज मंदिर’ येथे विद्यार्थ्यांना दर्शनासाठी नेण्यात आले होते.
शाळेतील मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते आणि उपशिक्षक श्री.दिनेश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षिका योगिता फाळके,मनीषा सोनार, संगीता पाटील, श्वेता सोनकुसरे,प्रतीक्षा पाटील, कविता पाटील, रोशनी महाजन नीतू शेलकर, गौरी निकुंभ तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील व सविता चौधरी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य लाभले.
अशाप्रकारे शाळेत आषाढी एकादशी आनंदाने व उत्साहाने साजरी झाली विठ्ठल आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.