कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा . .
आज दि. १० जुलै २०२५ रोजी कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे विद्यार्थी व शिक्षक सहभागातून ” महर्षी वेद व्यास यांच्या जयंती दिनानिमित्त गुरुपौर्णिमा ” मोठ्या उत्साहात साजरा झाली. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षिका मा. सौ. मनिषा गवळी मॅडम अध्यक्ष स्थानी विराजमान होत्या. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते महर्षी वेद व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गुरू ब्रह्मा गुरू विष्णू… ही प्रार्थना सार्वजनिक रित्या गायन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम महाजन व सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन हे आवर्जून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. अण्णासाहेब माळी बी. एन. जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री. काशिनाथ माळी, क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे, लिपिक श्री. चेतन महाजन शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित