*महानगरपालिका क्षेत्रीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सभा संपन्न………*
जळगांव प्रतिनिधी
सन २०२५-२०२६ मधील महानगरपालिका क्षेत्रीय शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा संघटना पदाधिकारी व शहरातील विविध विद्यालयाचे क्रीडा शिक्षक यांची एकत्रित सभा आज महानगरपालिकेच्या सभागृहात जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री.ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेस प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त आयुक्त श्रीमती निर्मला गायकवाड, महानगरपालिका क्रीडा समिती सदस्य श्री.राजेश जाधव, उपशिक्षणाधिकारी श्रीमती स्वाती हवेले, महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री.खलील शेख, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम, महानगरपालिका क्रीडा अधिकारी श्री. दिनानाथ भामरे, महानगरपालिका नगरसचिव श्री.सुनिल गोराणे यांची प्रमुख उपस्थिती होती क्रीडा शिक्षकांच्या वतीने आयुक्त श्री.ज्ञानेश्वर ढेरे यांचा सत्कार श्री.राजेश जाधव यांनी तर अतिरिक्त आयुक्त श्रीमती.निर्मला गायकवाड यांचा सत्कार प्रा.हरीश शेळके यांनी केला आयुक्त श्री. ढेरे यांनी क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील पण स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग वाढला पाहिजे तसेच महानगरपालिका शाळेतील खेळाडूंसाठी आपण आपल्यातील विविध खेळाचे प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावेत म्हणजे त्यांचे प्रशिक्षण शिबिर घेता येतील असे प्रतिपादन केले श्रीमती निर्मला गायकवाड यांनी स्पर्धा आयोजनाबाबत मनपाची भूमिका व सहकार्य यावर माहिती दिली प्रशासनाधिकारी श्री.खलील शेख यांनी स्पर्धेत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे तसेच मनपा शाळेतील शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे असे सुचविले, क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम यांनी स्पर्धा आयोजन, आयोजन नियमावली, स्पर्धा ऑनलाईन प्रक्रिया यावर माहिती दिली महानगरपालिका क्रीडा समिती सदस्य श्री.राजेश जाधव यांनी स्पर्धा आयोजन मधील अनुदानीत ४९ खेळ व विनाअनुदानित ४४ खेळाची माहिती देवून,खेळ वाटप प्रक्रिया यावर माहिती दिली तसेच १४ वयोगटाच्या खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागते तेथे असणारी गर्दी यामुळे खेळाडूंचा व क्रीडा शिक्षकांचा वेळ वाया जातो व आर्थिक भुर्दंड देखील पडतो त्यामुळे महानगरपालिका रुग्णालय यांचेकडून फिटनेस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावेत याबाबत सूचना मांडली मा.आयुक्त यांनी ही सूचना मान्य करून संबंधितांना तसे आदेश देण्यात येतील असे सांगितले. सभेचे सूत्रसंचालन नगरविकास सचिव श्री सुनिल गोराणे यांनी तर आभारप्रदर्शन मनपा क्रीडा अधिकारी श्री दिनानाथ भामरे यांनी केले राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली सभेस शहरातील विविध विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व जिल्हा क्रीडा संघटना पदाधिकारी यांची उपस्थिती होती.