जळगाव प्रतिनिधी
के.सी .ई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस शाळेचे पर्यवेक्षक मा.श्री एन. बी. पालवे ,सौ.प्रतिभा लोहार श्री.डी.ए.पाटील सर,श्री.महेंद्र नेमाडे सर ,सौ.पुनम कौल्हे मॅडम यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले .
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. निर्मल चतुर सर यांनी कीर्तन सादर करून गुरुशिष्य परंपरा आईचे महत्व विशद केले. सदर कीर्तनात टाळकरी म्हणून विद्यालयातील विद्यार्थि विवेक थोरात, अश्विन गाढे, भावेश मनोरे, भावेश वंजारी, अनिकेत गाजरे, उज्वल मराठे या विद्यार्थ्यांनी साथ दिली. इयत्ता पाचवीच्या अनुश्री चौधरी,जिग्नेश पाटील, खुशी पाटील ,हेमाशी चौधरी या विद्यार्थ्यांनी गुरु व शिष्य यांच्या गोष्टी सांगितल्या . गुरुपौर्णिमेचे महत्त्व भूमिका चौधरी या विद्यार्थिनींने सांगितले. तर लोक्षदा महाजन,प्रांजल सपकाळे यांनी गुरुवंदना नृत्य सादर केले.
१०वी अ या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वनिधी संकलित करून विद्यालयासाठी स्वच्छतेसाठी साहित्य
भेट दिले..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.डी.ए. पाटील ,सौ.प्रतिभा लोहार,सौ. सुचिता बाविस्कर,श्री.डी.बी. चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार सी. बी. कोळी यांनी केले.