• Fri. Jul 11th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

“गुरूविण कोण बतावे वाट – भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी”

Jul 10, 2025

Loading

“गुरूविण कोण बतावे वाट – भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी”

 

जळगाव प्रतिनिधी

भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष जी मेढे होते.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी पुष्प देऊन आपल्या आदरणीय गुरुजनांचे स्वागत केले.
याप्रसंगी . शाळेचे मुख्याध्यापक श्री एस जी मेढे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, “ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुरुची किती साधना करायची असते व किती नम्रतेने वागायचे असते, गुरुच्या तोंडून पडलेला शब्द हा ब्रह्म शब्द म्हणायचा असतो असे सांगितले,” तसेच इतिहासातील वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे देऊन त्यांनी गुरु शिष्य नाते पटवून दिले. इतिहासातील शबरी आणि प्रभू श्रीराम यांचे उदाहरण देऊन त्यांनी शबरी आपल्या गुरुला म्हणजे प्रभू श्रीरामाला भेटण्यासाठी किती आतुर झालेली होती शेवटी तिच्या गुरुने म्हणजे प्रभू श्रीरामाने शिष्याची भक्ती पाहून तिला दर्शन दिलेले होते. गुरुची खरी भक्ती केल्याने कोणते फळ मिळते हे यावरून लक्षात येते.” अनेक शिक्षक बंधूंनी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन गुरुचे महत्व पटवून दिले. “गुरुविण कोण बताये वाट. गुरु शिवाय कोणीच वाट दाखवू शकत नाही गुरुचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व फार आहे” अशी गुरुची महती सांगताना ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी गुरुची महती पटवून दिली. शाळेच्या शिक्षिका श्रीमती ज्योती शिरतुरे, श्रीमती रेखा सोनवणे श्री एस टी चौधरी व नाना पाटील यांनी वेगवेगळ्या प्रकारची इतिहासातील दाखले देऊन अंधारातून प्रकाशाकडे जर कोणी नेण्याचे कार्य करत असेल तर तो गुरुच असतो म्हणून गुरुचे उपकार शिष्याच्या प्रती खूप असतात म्हणून शिष्याने गुरुला वरिष्ठ स्थानी मानलेच पाहिजे. “ज्या ज्या लोकांनी आपल्याला घडवलं नावा रूपाला नेलं ते आपले सर्व गुरुच असतात मग ते शिकवणारे गुरुजन असत किंवा आपले आई वडील असत. या सर्वांचे उपकार व त्या उपकाराची परतफेड करणे शिष्याला कदापि जमणार नाही ” असे श्री एस टी चौधरी आपल्या भाषणात म्हणाले. नम्रता आणि सभ्यता जर आपल्यात असेल तर आपण जगातील कोणतीही असाध्य साध्य करू शकतो असे श्रीमती धांडे टीचर आपल्या भाषणात म्हणाल्या. ज्ञान मिळवण्याचा मार्ग म्हणजे नम्रता, विनयशीलता हे गुण ज्यांच्याजवळ असतील तो ज्ञान मिळू शकतो व हे गुंजाच्या जवळ आहे तो विद्यार्थी गुरूला सुद्धा आवडतो असे नाना पाटील आपल्या भाषणात म्हणाले.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका शालिनी बनसोडे मॅडम, श्री दीपक भंगाळे सर , श्री मनोज किरंगे सर, पुनम देवकर मॅडम, श्री अरुण नेटके, लक्ष्मण भाऊ पवार, श्री. के डी चौधरी, मनोज चौधरी, श्रीमती मंदाकिनी मोरे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक . नरेंद्र राठोड यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना लाडू वाटपाचा कार्यक्रम झाला. आभार श्रीमती ज्योती शिरतुरे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *