• Fri. Jul 11th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पिंपळेरोड व ढेकूरोड परिसरासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी , पिंपळे रोड परिसरातील समस्त नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

Jul 10, 2025

Loading

पिंपळेरोड व ढेकूरोड परिसरासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी

पिंपळे रोड परिसरातील समस्त नागरिकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
पिंपळे रोड व ढेकु रोड परीसरात दरवर्षी शेकडो लोक मृत्यू मुखी होत असतात, परंतु सदरील परिसरातील नागरिकांना ताडेपुरा येथिल एकमेव स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात. ताडेपुरा येथिल स्मशानभूमी ही आमच्या परिसरा पासून ३-४ किमी अंतरावर आहे, तसेच सदर स्मशानभूमीत जाण्यासाठी बस स्थानक व दगडी दरवाजा असे वर्दळीचे ठिकाण येतात त्यामुळे बऱ्याच वेळा अंत्यसंस्कार करण्यासाठी विनाकारणअडथळे निर्माण होऊन अन्त्यविधी करीता देखील उशीर होत असतो. तसेच बाहेरगावाहून आलेले आप्तेष्ट नातेवाईक यांना सुद्धा स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी मोठे अडचणी निर्माण होतात.
अमळनेर नगरपरिषद ने सन २०१७ मध्ये पिंपळे रोड परिसरा करीता ठराव मंजूर केलेला आहे.परंतु जागे अभावी आजपावेतो सदरचा प्रस्ताव आपल्या मंजुर न होता धूळ खात पडुन आहे.
सबब महाशयांस विनंती की, पिंपळे रोड परिसर लगतं असलेल्या सरकारी जागेतून स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध करुन, पिंपळे रोड परिसर व ढेकू रोड परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा ही विनंती.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड.यज्ञेश्वर पाटील ,डी.ए. धनगर , प्रफुल बोरसे ,संदीप सोनवणे, अविनाश पाटील ,ज्ञानेश जोशी, गणेश पाटील, राकेश बाजीराव पाटील, तुषार पाटील, अनिरुद्ध शिसोदे, राकेश पाटील ,मनीष पाटील, इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *