सार्वजनिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकेश नाथ (विद्यार्थी), संस्थाध्यक्ष अनिल महाजन, संस्थेचे सचिव विलासदादा चौधरी, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील, प्रमुख अतिथी शुभांगीनी महाजन, ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे यांच्या हस्ते व्यास ऋषींच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता दहावी ब च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार केला. कोमल कासार, हर्षाली पाटील, लोकेश वाघ, सृष्टी डोळसे, सिद्धार्थ कापडणे,श्लोक गवळी, शाश्वती माळी,छायेंद्र पाटील या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यांच्या नात्याविषयी मनोगत व्यक्त केले. अर्शिया पिंजारी व संजीवनी घुले विद्यार्थिनींनी गुरु शिष्याच्या नात्यावर आधारित सुंदर कविता सादर केली. अध्यक्ष अनिल महाजन यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांविषयी आदर ठेवला पाहिजे, त्यांच्याविषयी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, ते आपल्या जीवनातील खरे गुरु असतात, असा संदेश दिला.प्रमुख अतिथी शुभांगीनी महाजन यांनी खरा गुरु हा आपला मित्र,हितचिंतक किंवा ज्याच्या प्रेरणेतून आपल्याला शिकायला मिळते असा असू शकतो हे विविध गोष्टीतून पटवून दिले.मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल व पर्यवेक्षक एल. जे. पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना गुरूंचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी पाटील,प्रास्ताविक कोमल नारखेडे तर आभार दक्ष कोल्हे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भावना चौधरी, जागृती नारखेडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.