“वाढदिवस साजरा वृक्षारोपणाने – अमळनेर राष्ट्रवादीचा निसर्गपूजेसह सन्मान सोहळा”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातर्फे एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देत लिंबाचे आणि बदामाचे वृक्षारोपण करण्यात आले.
ही अभिनव सुरूवात गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी करण्यात आली असून, उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून गुरुजनांना वंदन करण्यात आले.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम हिंगोणे गावाच्या माजी सरपंच आदरणीय राजश्रीताई पाटील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती आदरणीय तिलोत्तमाताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाला आदरणीय रीताताई पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्षा भारतीताई शिंदे, तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे आणि शहराध्यक्ष आशाताई चावरिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमातून पर्यावरणाचे भान आणि सामाजिक भान ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.