*फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमा साजरी*
अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी येथे विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक व शिक्षकेतर गुरूंसाठी कृत्रज्ञतापर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.कल्याणी सतिष लांडगे व रिमझिम दिपक तोलानी यांनी केले.
कु.रेणुका जोशी व कु.वेदांती चौधरी यांनी गीत गायन केले.तसेच कु.साक्षी प्रविण सोनवणे, कु.अश्विनी चौधरी, कु.वैष्णवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या निमित्ताने प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त विविध पुस्तके ग्रंथालयास भेट स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या बद्दल प्रा.रविन्द्र माळी व सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यानी प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास प्रा.देवेश प्र. भावसार, प्रा. प्रफुल्ल चव्हाण, प्रा. प्रितम पाटील, प्रा.सतिश ब्राम्हणे, प्रा. छाया महाजन, प्रा. स्वप्नाली महाजन, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. वर्षा पाटील, प्रा. प्रियंका महाजन, सौ.कविता शिंपी त्याचप्रमाणे श्री.अनिल महाजन,श्री.ज्ञानेश्वर चौधरी, श्री.जितेंद्र पाटील, श्री.शिवाजी पाटील, श्री.विनय ब्रम्हे, श्री.प्रकाश पाटील उपस्थित होते.
सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या.