रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार
1 min read

रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार

Loading

रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार

अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आयुर्वेदिक निदान व पंचकर्म शिबीर अमळनेर शहरातील बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल कंपाउंड येथे १३ जुलै रोजी अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

या शिबिरात भारतभरातील विविध राज्यांतून आलेले ३७ आयुर्वेदिक डॉक्टर्स सहभागी झाले होते. त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावाचा अमळनेरकर रुग्णांना मोठा लाभ झाला.
विशेषत: प्रा. संभाजी पाटील आणि डॉ. सुमित पाटील यांचे या शिबिराच्या आयोजनात अनमोल सहकार्य लाभले.

शिबिरात सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ३५१ रुग्णांची तपासणी झाली. त्यामधून २९० रुग्णांवर विविध स्वरूपाचे पंचकर्म उपचार करण्यात आले.
✅ शिरोधारा, बस्ती, अभ्यंग, स्वेदन, बस्ती, नस्य (नाक में दवा डालना), और रक्तमोक्षण
✅ महिलांसाठी विशेष उपचार
✅ ७ दिवसांची मोफत आयुर्वेदिक औषधी व १ दिवसाचे पंचकर्म

या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध आयुर्वेचार्य डॉ. प्रविण जोशी (धुळे) होते.
याच कार्यक्रमात डॉ. शरद बाविस्कर यांनी स्वतः तयार केलेले पेन्सिल स्केच डॉ. जोशी यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, ही बाब सर्व उपस्थितांसाठी भावनिक व प्रेरणादायी ठरली.

शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यात पुढील सदस्यांचे योगदान लक्षणीय ठरले:
🔸 ए.जी. पूनम कोचर, रोहित सिंघवी, राजेश जैन, दिलीप भावसार, प्रदीप पारख, चेलाराम सैनानी, अभिजीत भंडारकर, कीर्ती कुमार कोठारी, प्रतीक जैन, डॉ. निलेश जैन, विजय पाटील, दिनेश रेजा, अविनाश अमृतकर, डॉ. शरद बाविस्कर, किशोर लुल्ला, ऋषभ पारख, योगेश येवले, विवेक देशमुख, प्रीतपाल सिंग बग्गा, सुबोध पाटील, सौरभ जैन, महेश पाटील, सुंदरदास वच्छाणी, भरत बोथरा, तहा बुकवाला.

शिबिराचे संयोजक आयुर्वेदाचार्य डॉ. रुचिता वैभव कोठेकर (पाटील) व डॉ. वैभव शिवाजीराव कोठेकर (पाटील), बीड हे होते.

अमळनेरमधील विविध सामाजिक संघटनांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले व पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

या शिबिरासाठी नोंदणी केंद्रे डॉ. सुमित पाटील (व्हेटरनरी), अविनाश मेडिकल, अरिहंत मेडिकल, बजरंग सुपर मार्केट व पतंजली आरोग्य केंद्र, अमळनेर येथे कार्यरत होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रो.देवेंद्र कोठारी, सचिव रो.आशिष चौधरी व प्रकल्पप्रमुख रो. धिरज अग्रवाल यांनी समन्वय साधून प्रभावी नेतृत्व केले.

One thought on “रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार

  1. मराठी लाईव्ह न्युज अत्यंत कमी वेळेत बातमी वाचकापर्यत पोहचवतो..
    सर्व टिमचे मनापासून धन्यवाद.. व शुभेच्छा!!
    💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *