भेट विजय गव्हाणे, जयप्रकाश मुंदडा यांची..आठवण परभणीची!*
1 min read

भेट विजय गव्हाणे, जयप्रकाश मुंदडा यांची..आठवण परभणीची!*

Loading

*भेट विजय गव्हाणे, जयप्रकाश मुंदडा यांची..आठवण परभणीची!*
सप्रेम नमस्कार,
आज विधानभवनात माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष विजय गव्हाणे यांची भेट झाली. दोघांनाही खूप आनंद झाला.ते चहापानासाठी त्यांच्या विधानभवनातील कार्यालयात आग्रहाने घेवून गेले.तेथे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा व सुधाकर गणगणे यांचीही भेट झाले. यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनचे आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले हेही माझ्या समवेत होते. विजयरावाचा आणि माझा स्नेह १९८६ सालापासूनचा. त्यावेळी मी लोकमताचा जिल्हा प्रतिनिधी होतो तर ते शेतकरी कामगार पक्षाचे परभणीचे डॅशिंग आमदार म्हणून महाराष्ट्रात गाजत होते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अण्णासाहेब गव्हाणे यांचे विजयराव चिरंजीव! त्यांच्याशी मी व विकास भोसलेनी मस्त गप्पा मारल्या. परभणीतील आठवणी जागवल्या.
*राजा माने,*
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
-संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
-सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *