
लोकस्वातंत्र्य म्हणजे खऱ्या कर्तृत्वाने राज्याबाहेर जाऊन पोहचलेला पत्रकार महासंघ..! पुष्पराज गावंडे* *लोकस्वातंत्र्यच्या चळवळीत बुलढाण्याची ताकद उभी करू …..जगदिश अग्रवाल* *दमाणीच्या सभापती शुक्ल यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार!*
*लोकस्वातंत्र्य म्हणजे खऱ्या कर्तृत्वाने राज्याबाहेर जाऊन पोहचलेला पत्रकार महासंघ..! पुष्पराज गावंडे*
*लोकस्वातंत्र्यच्या चळवळीत बुलढाण्याची ताकद उभी करू …..जगदिश अग्रवाल*
*दमाणीच्या सभापती शुक्ल यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार!*
*पत्रकार जगदिश अग्रवाल,दमाणीचे हर्षे,पवार,साळवे,मुदलियार व देशमुख यांचेही सन्मान*
*अकोला* – पत्रकार आणि सामाजिक कल्याणाचा एकच ध्यास घेऊन संघर्षक चळवळीतील खऱ्या कर्तृत्वाने महाराष्ट्रभर संघटन आणि पाच राज्यामध्ये पोहचलेली लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे.पत्रकार आणि साहित्यिक ह्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यानुसार प्रत्येक राष्ट्रीय पदाधिकाऱ्याला मासिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद देण्याच्या संघटना अध्यक्षांच्या सन्मानजनक समतावादी निर्णयानुसार एका साहित्यिकाला पत्रकार महासंघाचं अध्यक्षपद देण्यात आलं.असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य व याच पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी व्यक्त केले. संघटनेचा ४७ वा मासिक विचारमंथन मेळावा गावंडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.पत्रकार महासंघासोबत गेल्या १० वर्षापासून गरीबांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिम राबवणाऱ्या दमाणी नेत्र रूग्णालयाचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती शुक्ल हे पुरस्कारार्थी व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.खामगावचे ज्येष्ठ पत्रकार,युवा दर्शन संपादक जगदिश अग्रवाल तथा डॉ.मनिष हर्षे यांचा सुध्दा प्रमुख अतिथींमध्ये समावेश होता.तर व्यासपीठावर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व जिल्हा सचिव मनोहर मोहोड यांची उपस्थिती होती.
सभापती शुक्ल यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून दृष्टीदानाच्या मानवसेवी कार्यासाठी पत्रकार महासंघाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन पुरस्काराच्या सन्मानजनक भावनांबध्दल आभार व्यक्त केले. लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख यांनी विविध उपक्रम,मागण्यांना शासन,प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद, संघटनेचे पदाधिकारी भ्रष्टाचार,अनाचार आणि कामचुकार नोकरशाहीविरूध्द राज्याभर करीत असलेल्या आक्रमक कार्याबध्दल माहिती दिली. भेदभावरहीत काम करत प्रत्येकाचा सन्मान करणारी ही संघटनेत ५ राज्यानंतर गोवा राज्य प्रभारीची निवड झाल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.याप्रसंगी जगदिश अग्रवाल व मोतीबिंदुमधील उल्लेखनिय सेवाकार्याबध्दल दमाणी रूग्णालयाचे डॉ.मनिष हर्षे, डॉ.दत्ताजी पवार,पवन साळवे,राजु मुदलियार व अजय देशमुख या सहकाऱ्यांचे सन्मान स्मृतीचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन भावनिक सन्मान करण्यात आले. संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व आय कार्ड वितरण करण्यात आले.ईयत्ता चौथीमध्ये सर्व विषयात १०० टक्के गुण मिळवणाऱ्या सार्थक दिपाली दिनेश बाहेकर याचा प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह,बॅडमिंटन संच देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जगदिश अग्रवाल यांनी लोकस्वातंत्र्यच्या वाटचालीचा गौरव करून या चळवळीत बुलढाणा जिल्ह्याची ताकद उभी करण्याचे अभिवचन देऊन यशस्वी कार्याचा गौरव केला.
या राष्ट्रीय कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख,प्रा.डॉ.संतोष हुशे,अंबादास तल्हार,सिध्देश्वर देशमुख,संदिप देशमुख,अरविंदराव देशमुख, डॉ.शंकरराव सांगळे, प्रा.राजाभाऊ देशमुख,डॉ.विनय दांदळे,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,संजय देशमुख, कंझरेकर,अमरावतीहून रावसाहेब देशमुख प्रा.हेमंत बुरंगे,अमरावती अध्यक्ष संजय देशमुख,गावंडगांवकर,अशोककुमार पंड्या,के.व्ही.देशमुख,प्रविण बोपूलकर,(शब्दवेल,पनवेल) शामराव देशमुख,खामगावहून रामराव देशमुख,पुरूषोत्तम मोरखडे अरूण भटकर ( शेगाव) तथा रवि पाटणे,नरेन्द्र देशमुख,विजय देशमुख,सुरेश पाचकवडे,प्रविण हटकर,वसंतराव देशमुख,कैलास टकोरे,आशिष वानखडे पाटील व सौ.वानखडे, सौ.दिपाली बाहेकर,अनुराधा पवार,सौ.यशोदा गव्हाळे,गजाननराव देशमुख,बुढन गाडेकर,रमेश कुचे,साहेबराव साठे,दिलीप नवले,सतिश देशमुख,गजानन मुऱ्हे,प्रा.सुरेश मोरे,राजेश वानखडे,गौरव देशमुख,अजय वानखडे,फुलचंद वानखडे,एजाज खान,रमेश समुद्रे,दिपक सिरसाट,पांडूरंग आगळे,फुलचंद मौर्य,गौरव अतकरे,अमित इंगळे,दम्माणी नेत्र रूग्णालय कर्मचारी,व अनेक पत्रकार उपस्थित होते.
सौ.जया भारती आणि प्रा.देवबाबू लूले यांनी कार्यक्रमाचे बहारदार संचलन व आभारप्रदर्शन केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
=================================