
होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन
होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन
पुणे शिंदवणे: महसूल विभाग ,छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम येथे राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. उरळीकांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी होमिओपॅथीच्या समस्या सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना निवेदन दिले. प्रतिनिधींशी बोलताना डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की होमिओपॅथी वैद्यकीय क्षेत्रात काळानुसार व गरजेनुसार क्रांती व्हावी तसेच ऍलोपॅथी औषधे रुग्णांना देण्याची परवानगी होमिओपॅथिक डॉक्टरांना मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 2014 मध्ये सी.सी.एम.पी हा एक वर्षाचा फर्मॅकॉलॉजी कोर्स शासकीय व प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या देखरेखे खाली सुरू केला. या सी. सी. एम .पी कोर्समुळे होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळाली. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशन आय. एम.ये संघटनांनी या कोर्सला विरोध केला. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल एम. एम .सी मध्ये होमिओपॅथिक सीसीएमपी डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही. हा कोर्स वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकविला गेला, तसेच होमिओपॅथिक डॉक्टरांना चार वर्षे शिकून एक वर्षे एंट्रन्स शिप करावी लागते. मेडिकल कॉलेजच्या अभ्यासाप्रमाणे सर्व विषय शिकविले जातात. याचा अर्थ असा की होमिओपॅथिक डॉक्टर ऍलोपॅथीची प्रॅक्टिस योग्य प्रकारे करू शकतात.या अलीकडच्या धकाधकीच्या काळामध्ये जवळपास सर्वच क्षेत्रातील प्रॅक्टिशनर ऍलोपॅथीचा वापर करतात किंवा करावा लागतो. म्हणून सीसीएमपी कोर्स झालेल्या डॉक्टरांचे एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन व्हावे व त्यांची स्वतंत्र नोंद व्हावी ,त्यांना शासकीय सुविधा मिळाव्यात, प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये नोकरी मिळावी, यासाठी आझाद मैदान येथे होमिओपॅथिक डॉक्टरांनी आंदोलन सुद्धा केले आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय मिळण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ,अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन, संस्थापक अध्यक्ष उरुळी कांचन डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन यांनी या भागातील विद्यमान आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊली अण्णा कटके यांना निवेदन दिले. या वेळीअनेक परिसरातील मान्यवर डॉ. उपस्थित होते.