• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी. -डॉ.सुभाष घुले

Jul 1, 2025

Loading

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी.
-डॉ.सुभाष घुले

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जून 2025 रोजी इजिनिअर असोसिएशन हॉल,उद्यमनगर,कोल्हापूर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर गेडाम, प्रमुख गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. पांडूरंग बामने, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा, डॉ.सुभाष घुले उपसरव्यवस्थापक,पणन मंडळ कोल्हापूर, कृषि विज्ञान केंद्र कनेरीचे प्रा. पांडूरंग काळे, गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासाहेब पाटील, पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, सुयोग टकले, व गुळ उत्पादक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केली. गुळ उत्पदकांनी गुळ निर्यात करणेकरीता अपेडा चे माध्यमातून प्रयत्न करावे भौगोलिक मानांकन अतर्गत वैयक्तिक गुळ उत्पादकांनी नोंदणी करणे अवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जि आय नोंदणी करावी, जेणेकरून कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यास मदत होईल याबाबत कृषी पणन मंडळा च्या योजनांचा फायदा गूळ उत्पादकांनी घ्यावा असे सांगीतले. तसेच पणन मंडळाच्या योजनांबाबत माहिती दिली. अपेडाचे श्री. पांडूरंग बामने यांनी अपेडाच्या योजना, निर्यात क्षेत्रातील संधी, गॅप प्रमाणपत्र, गुळाची मागणी, गुळ प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. पांडूरंग काळे यांनी गुळ उत्पादन वाढीबाबत व त्याच्या प्रतवारी बाबत मार्गदर्शन केले. उत्तम प्रतीचा गूळ कसा तयार करावा याबाबत डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासोहेब पाटील यांनी गुळ उत्पादकांनी कोमिकल विरहीत उत्तम प्रतीचा गुळ उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर गुळाची निर्यात करू असे नमुद केले. तसेच विविध देशाचे प्रतवारी मानके काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले. गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण करणे बाबत प्रश्न उपस्थित केला, यावर श्री बामने यांनी याबाबत शेतकर्‍यांनी अपेडा कडे संपर्क केल्यास त्याबाबत मदत केली जाईल आसे सांगितले. कार्यशाळेस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातीन गुळ उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यशाळा संपले नंतर गूळ संशोधन केंद्राच्या गुऱ्हाळ गृह भेट देण्यात आली. यावेळी डॉ गोविंद येनके यांची सर्वाना प्रकल्पा विषई सविस्तर माहिती सांगितली. यावेळी डॉ गेडाम यांनी आधुनिक तंत्रज्ञान गूळ उत्पादनात वापरणे गरजेचे असल्याचे नमूद केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पणन मंडळाचे श्री.ओंकार माने यांनी केले व प्रा. पांडूरंग काळे केविके कन्हेरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *