“35 वर्षांच्या सेवेला सलाम – डॉ. भोळे यांचा गौरव, पद्मश्रीसाठी कार्यकर्त्यांची मागणी”
उरुळी कांचन प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार व अपंगसेवक ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे यांचा राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या भोळे महाराजांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळावा, अशी मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली.
कार्यक्रमात दैनिक सकाळच्या प्रतिनिधी सुवर्णा कांचन यांनी डॉ. भोळे यांच्या कार्याची महती सांगताना, “ज्ञान-विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे ते एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे,” असे मत व्यक्त केले.
शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे महंत गोपाळ व्यास कपाटे म्हणाले, “कोरोना काळात व मराठवाडा भूकंपात त्यांनी दिलेली वैद्यकीय व सामाजिक सेवा अतुलनीय आहे. डॉ. भोळे हे कर्मफलाची अपेक्षा न ठेवता निष्कामकर्म योग साधणारे व्यक्तिमत्त्व आहे.”
यावेळी दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले, ज्येष्ठ पत्रकार सुनील तुपे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी एकमुखाने डॉ. भोळे यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.