• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा उत्साहात संपन्न.. सुदृढ आणि निरोगी युवा पिढी घडवण्यासाठी योग प्रशिक्षण महत्त्वाचे आहे;; क्रीडा अधिकारी राजेश भगत यांचे प्रतिपादन.

Dec 1, 2022

Loading

मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा उत्साहात संपन्न.. सुदृढ आणि निरोगी युवा पिढी घडवण्यासाठी योग प्रशिक्षण महत्त्वाचे आहे;; क्रीडा अधिकारी राजेश भगत यांचे प्रतिपादन.

कल्याण( मनिलाल शिंपी):: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व शिक्षण विभागाअंतर्गत आंतर शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धा मॉडेल इंग्लिश स्कूल कुंभार खानपाडा डोंबिवली पश्चिम येथे खेळ प्रमुख व क्रीडा समिती सदस्य कृष्णा बनगर यांच्या नियोजनाखाली, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहायक उपायुक्त व नोडल ऑफिसर स्नेहा करपे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी राजेश भगत यांच्या प्रभावी नेतृत्वात,आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा प्रमुख उपस्थितीत इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सवलती का नायर त्यांचा हस्ते योगा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुषमा गोपीनायन, श्रीमती शायमा मॅडम, आणि अरुण महाजन सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्याण डोंबिवली जिल्हा आंतर शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धा मध्ये 14 वर्षे वयोगट 17 वर्षे वयोगट आणि 19 वर्षे वयोगटातील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धा यशस्वीतेसाठी मॉडल इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक सुनील पाटील, मेघा परब, डी के व्ही सी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे क्रीडा संघटक अनंत उतेकर, यांनी विशेष परिश्रम घेतले. कल्याण डोंबिवली आंतर शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धेमधून 46 योगा खेळाडूंना उत्कृष्ट योगा प्रदर्शन करून प्राविण्य मिळवले आहे म्हणून त्यांना मुंबई विभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जिल्हास्तरीय खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे. या यशाबद्दल बोलताना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा अधिकारी राजेश भगत यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करताना सांगितले की आरोग्य आणि मन सगळे ठेवायचे असेल तर प्रत्येक शाळेमध्ये योगा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यामुळे देशाला नव्हे तर जगात आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार नाहीत असेही क्रीडा अधिकारी राजेश भगत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *