• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जुन्या पेन्शनसाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा 3 डिसेंबरला जळगांवला मेळावा…
सर्व पेंशन पिडीत कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

Dec 1, 2022

Loading

जुन्या पेन्शनसाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा 3 डिसेंबरला मेळावा…

सर्व पेंशन पिडीत कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…

जळगांव प्रतिनिधी

चलो जळगाव चलो जळगाव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भव्य मेळावा

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान अंशत: अनुदानावरअसलेले व त्यानंतर 100% अनुदानावर आलेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयोजित

जुनी पेंशन जिल्हास्तरीय नियोजन/चिंतन बैठक
प्रमुख उपस्थिती – माननीय दादासो शालिग्राम भिरुड सर
अध्यक्ष जळगाव माध्यमिक पतपेढी , जळगाव
स्थळ: माध्यमिक शिक्षक पतपेढी जळगाव

वार. शनिवार 3 .12.2022
दुपारी दोन वाजता

बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

1) यापुढे 1नोव्हेंबर 2005पूर्वी नियुक्त कर्मचारी जुनी पेन्शन समन्वय समिती या नावाने सर्व पत्रव्यवहार होईल.

2)या समन्वय समितीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पीडित बंधू भगिनींनी लढ्यात सक्रिय सहभागी होण्याबाबतीत

3) येत्या 3 डिसेंबर रोजी शिष्टमंडळ मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेईल.

4) 10 डिसेंबर 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले जाईल.

5) नागपूर अधिवेशन काळात आंदोलन करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल.

6) हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निर्णय न झाल्यास जानेवारी 2023 मध्ये आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल.

7) राज्यातील सर्व विधानसभा व विधानपरिषद आमदार यांना भेटून अधिवेशन काळात लक्षवेधी लावण्यासाठी विनंती करावी.*यावेळी सर्वांनी लढ्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन करण्यात आले.*

श्री संभाजी पाटील सर
जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना.
श्री डॉ शांताराम पाटील
जिल्हा कार्याध्यक्ष जुनी पेन्शन योजना जळगाव
सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी जुने पेन्शन कोर कमिटी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपल्या तालुक्यातील लिहिलेले पत्र सोबत घेऊन यावे मिटिंगच्या ठिकाणी जमा केले जातील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *