
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ आढावा बैठक मा.ना.श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
कल्याण ठाणे ( मनिलाल शिंपी )::, आज दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी ६.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील सर्वसह जिल्हा संयोजक भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांची आभासी बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतते.या बैठकीत कोकण विभागातील सर्व भाजपा जिल्हा संयोजकांनी आपापल्या जिल्ह्यातील आजपर्यंतचा मतदार नोंदणीचा आढावा व आता चालू असलेली मतदार नोंदणी यासंदर्भात मंत्रिमहोदयांना आढावा सादर केला. मंत्री महोदयांनी या बैठकीत एकही शिक्षक मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शिक्षकांना मतदार होण्याची आव्हान केले .तसेच सर्व जिल्हा संयोजकानी आपापल्या कार्यकारणी सह प्रत्येक शाळेमध्ये संपर्क साधून शिक्षक मतदार नोंदणी करण्याच्या सूचना केल्या. प्रदेश सहसंयोजक विकास पाटील यांनी मतदार नोंदणी करण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.तर कोकण विभाग संयोजक एन एम भामरे यांनी प्रास्ताविक केले, कार्यवाह विनोद शेलकर यांनी सुत्रसंचलन केले.
किशोर पाटील यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले या बैठकीस
प्रदेश सहयोजक अनिल बोरणारे, कोकण विभाग संघटक ज्ञानेश्वर घुगे , मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे ,दापोली वरून केदार साठे, सिंधुदुर्ग मधून प्रमोद राव राणे अतुल कळसेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.