1 min read

डॉ. दत्ता विघावे यांना कुशल नेतृत्व गुणाबद्दल विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Loading

डॉ. दत्ता विघावे यांना कुशल नेतृत्व गुणाबद्दल विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्कार

श्रीरामपूर : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशनतर्फे (अमेरिका) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीनेे

नेतृत्व कौशल्यासाठी दिला जाणारा या वर्षाचा मानाचा पुरस्कार
” ग्लोबल पिस लिडरशीप अवॉर्ड २०२२ “
वर्ल्ड पार्लमेंटचे वरिष्ठ सदस्य तथा महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांना नुकताच श्रीरामपूर येथे एका रंगारंग कार्यक्रमात दस्तूरखुद्द वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष प्रा.डॉ.ग्लेन टि मार्टिन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विशेष महत्वाचे म्हणजे डॉ.मार्टिन यांनी खास अमेरिकेहून सदर स्मृतीचिन्ह आणले होते.
जून २०१९ मध्ये वर्ल्ड पार्लमेंटचे प्राथमिक सदस्यत्व मिळाल्या नंतर डॉ. दत्ता विघावे यांनी डब्ल्यूसीपीएच्या वृध्दीसाठी केलेल्या कार्याचे फळ म्हणून डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना श्रीरामपूर चॅप्टरचे अध्यक्षपद मिळाले. त्याच महिन्यात त्यांनी वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन, उपाध्यक्ष प्रा.नरसिंहा मूर्ती, कोषाध्यक्षा मॅडम फिलीस टर्क व जेष्ठ सदस्य व गांधीवादी नेते ईपी मेनन यांच्या उपस्थितीत श्रीरामपूरमध्ये एक भव्य कार्यक्रम घेतला. या समारंभात विक्रमी सदस्य नोंदवून विश्वविक्रमांची नोंद घेणाऱ्या ” ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस ” मध्ये सदर कार्यक्रमाची नोंद झाली. सदर आशयाचे प्रमाणपत्र ओएमजीच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल प्रेसिडेंट प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन व डॉ. दत्ता विघावे यांना सुपूर्द केले.
त्यानंतर डॉ. दत्ता विघावे यांना थेट महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष करण्यात आले. या पदोन्नती नंतर त्यांचा सदस्यत्व वाढविण्याचा वेग वाढला. आजमितीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी सदस्य नोंदवून जगाच्या इतिहासात आपल्या कार्यक्षेत्रात शंभर टक्के सदस्य नोंदणी करणारा पहिला अधिकारी होण्याचा मान डॉ. दत्ता विघावे यांना मिळाला असून प्रत्येक महिन्याच्या जागतिक आढावा अहवालात सर्वोत्तम कार्याची पावती त्यांना मागील तीन वर्षांपासून सातत्याने मिळत आहे.
या दरम्यान निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील विविध क्षेत्रात उल्लेख कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्तींना हेरून डॉ. विघावे यांनी त्या लोकांना वर्ल्ड पार्लमेंटचे आजीव सदस्य बनविले. शिवाय त्यांना ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड ” देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्याची प्रथा सुरू केली.
त्याचबरोबर पर्यावरण, साहित्य, चित्रपट व खास करून महिलांसाठी स्वतंत्र पुरस्कार योजना सुरू करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात पुढचे पाऊल टाकले. आजवर ३५० पेक्षा अधिक सदस्य नोंदविताना आयएएस, आयपीएस, न्यायाधीश, वकील, शास्त्रज्ञ, उद्योजक, साहित्यीक, प्राध्यापक, संगीत, कला, क्रिडा, गिर्यारोहण, पर्यावरण तसेच इतरही अनेक क्षेत्रातील विद्यमान व माजी मान्यवरांना डब्ल्यूसीपीएच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये डॉ. विघावे यांना ओ.पी जिंदाल युनिव्हर्सिटी सोनीपत (हरियाणा) येथे वर्ल्ड पार्लमेंट मानाचा
” विश्व स्नेही ” हा अवॉर्डही अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन यांच्या हस्ते मिळाला होता.
कोविड-१९ च्या संक्रमण काळात डॉ. दत्ता विघावे यांच्या कार्याला चांगलाच जोर आला होता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड योद्धयांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या मोहिमेत देशभरातील पंधरा हजारांहून अधिक पोलिस, आरोग्य, प्रशासन, पत्रकार, समाजसेवक व इतरही अनेक क्षेत्रातील कोरोना योद्धयांना ऑनलाईन व ऑफलाईन ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल कोरोना वॉरियर अवॉर्ड ” देऊन सन्मानीत केले. या दरम्यान डॉ. विघावे यांनाही देशभरातील विविध संस्थानी सन्मातीत केले. त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन ” ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसने ” आपल्या विश्वविक्रमाची नोंद घेणाऱ्या पुस्तकात डॉ.विघावे यांच्या कार्याची नोंद केली.
आजमितीला डॉ. दत्ता विघावे हे डब्ल्यूसीपीचे राष्ट्रीय मिडीया समन्वयक या पदावर आहेत तर ग्लोबल वर्कींग कमिटी सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
डॉ. दत्ता विघावे हे स्वतः क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक म्हणून प्रसिद्ध असून क्रिकेटच्या या तिनही क्षेत्रात त्यांनी विक्रमी कामगिरी केली आहे तसेच क्रिकेटमधील उल्लेख कार्यासाठी अमेरिकन विद्यापिठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवीही दिली असून विश्वविक्रमांची नोंद घेणाऱ्या विविध रेकॉर्ड बुक्सने त्यांची दखल घेतली आहे. शिवाय “आई” या विषयावरील ” महामाय ” या विश्वविक्रमी काव्यखंडाचे संपादन ते करत असून येत्या उन्हाळ्यात या काव्यखंडाचे प्रकाशन अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते करण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ. विघावे यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून भारताच्या टपाल खात्यानेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन पाच रूपये किंमतीचा डाक तिकीटावर त्यांचा फोटो असलेले टपाल तिकीट जारी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *