कु.दिव्यांका प्रशांत सोनवणे हिचा 4 था वाढदिवस निमित्त दिव्यांग मुलांना अल्पोहार..

आज.दिनांक 14/12/2022 रोजी कु.दिव्यांका प्रशांत सोनवणे हिचा 4 था वाढदिवस निमित्त श्री.प्रशात सोनवणे (फर्म – अनुराधा अगरबत्ती, रा.विद्या विहार कॉलनी अमळनेर) व सोनवणे परिवाराच्या वतीने चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे, अल्पोपहार वाटप करण्यात आला. तसेच, निवासी विद्यार्थ्यांना अन्नदानासाठी 5000/- रुपये (अक्षरी-पाच हजार रुपये) आर्थिक मदत दिली.यावेळी परिवाराचे स्वागत शाळेचे उपमुख्याध्यापक हेमंत महाजन सर यांनी केले तसेच सुत्रसंचलन प्रताप पाटील यांनी केले तर शाळेची माहिती जगदीश सोनवणे यांनी दिली. श्री.प्रशात सोनवणे (अनुराधा अगरबत्ती, अमळनेर) व सोनवणे परिवाराचे खुप खुप आभार संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब योगेश रघुनाथ महाजन सर यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.